BHR SCAM : बीएचआर घोटाळा प्रकरणी नाशिक पालिकेच्या चौकशीची शक्यता
जळगाव मधील बहुचर्चित बीएचआर घोटाळा प्रकरणाचे नाशिक कनेक्शन आहे का? याची चौकशी होण्याची शक्यता, पुण्याची आर्थिक गुन्हे शाखा नाशिक महापालिकेच्या व्यवहाराची चौकशी करण्याची शक्यता , मनपा अधिकारी पदाधिकारी आणि ठेकेदारचे धाबे दणाणले, सुनील झंवर भाजप नेते गिरीश महाजन यांचे निकटवर्तीय, गिरीश महाजन नाशिकचे पालकमंत्री होते. त्यामुळे मागील सत्ता काळात नाशिक महापालिका, स्मार्ट सिटीच्या काही कामात सुनील झंवरचा थेट किंवा अप्रत्यक्ष सबंध आहे का याच तपास केला जाणार असल्याची चर्चा सध्या पालिका वर्तुळात सुरू आहे.