Jalgaon Rohini Khadse Detained : शिंदे-फडणवीसांच्या दौऱ्याआधी रोहिणी खडसे पोलिसांच्या ताब्यात
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या जळगाव दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर एकनाथ खडसेंच्या कन्या रोहिणी खडसे यांना पोलिसाांनी ताब्यात घेतलं आहे. तसंच, महानगर प्रमुख अशोक लाड वंजारी यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलं. शिंदे आणि फडणवीसांना काळे झेंडे दाखवणार असा इशारा राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे यांनी दिला होता. त्यानंतर पोलिसांनी ही कारवाई करत, राष्ट्रवादी कार्यालय परिसरात मोठा बंदोबस्त लावण्यात आला आहे.