Jalgaon NCP : राष्ट्रवादी काँग्रेसचं जळगाव जिल्ह्यातील अमळनेरमध्ये जोरदार शक्तिप्रदर्शन : ABP Majha
राष्ट्रवादी काँग्रेसनं आज जळगाव जिल्ह्यातील अमळनेरमध्ये जोरदार शक्तिप्रदर्शन केलं. ग्रंथालय सेलच्या अधिवेशनानिमित्त राष्ट्रवादीनं अमळनेरमध्ये भव्य रॅली काढली. यामध्ये अजित पवार आणि जयंत पाटील खुल्या जीपवर उभे होते.. राष्ट्रवादीचे अमळनेरचे आमदार अनिल पाटील यांच्या निवासस्थानापासून रॅलीला सुरुवात झाली. अमळनेरमध्ये आज राष्ट्रवादीच्या ग्रंथालय सेलनं अधिवेशन आयोजित केलंय... त्यात राष्ट्रवादीच्या अनेक दिग्गज नेत्यांनी हजेरी लावली.