Jalgaon Siddhi Mahaganapati : जळगावात देशातील सर्वात उंच सिद्धी महागणपतीची प्राणप्रतिष्ठा

आज संकष्टी चतुर्थी आहे... आणि आजच्या दिविशी देशातील सर्वात उंच सिद्धी महागणपतीची आज जळगावमध्ये प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहे. याच मूर्तीचं आम्ही तुम्हाला आता दर्शन घडवतो आहोत...३१ फुट उंचीची ही मुर्ती आहे. तसंच या मुर्तीचं वजन ३७४ टनाच्या आसपास आहे. अखंड दगडामध्ये ही मुर्ती बनवण्यात आली असून ही गणेश मुर्ती इतर गणेशमुर्तींपेक्षा वेगळी असल्याचं गावकऱ्यांचं म्हणणं आहे.. यामुर्तीचं खास वैशिष्ट्य म्हणजे ही मुर्ती भाव मुद्रेत असून मूर्तीच्या आजूबाजूला रिद्धी आणि सिद्धी, सोंडेत अमृत कुंभ, पोटावर नाग आणि कपाळावर घंटा अशी या मूर्तीचं वैशिष्ट्ये आहे.  यासंदर्भात अधिक माहिती देतायत आमचे प्रतिनिधी चंद्रशेखर नेवे सध्या आपल्यासोबत आहेत. चंद्रशेखर कीती वाजता या मुर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहे?

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola