Jalgaon Accident : जळगावात शर्यतीने घतेला चिमुकल्याचा बळी ABP Majha

जळगाव शहरातील मेहरूण ट्रॅकवर दोन कारमध्ये लागलेली शर्यत एका चिमुकल्याच्या जीवावर बेतली आहे. कारने दिलेला धडकेत सायकलस्वार चिमुकल्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना रविवारी सायंकाळी घडली. विक्रांत संतोष मिश्रा असे मृत्यू झालेल्या चिमुकल्याचं नाव आहे. हा अपघात एवढा जोरदार होता की या घटनेत कारच्या धडकेनंतर चिमुकला चेंडूसारखा हवेत उडाला. त्यातच त्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. धडक देणाऱ्या कारमधील तीन जणांना एमआयडीसी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.  

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola