Bachchu Kadu : मराठाप्रश्नी यशस्वी मध्यस्थीनंतर बच्चू कडू कोळी समाज उपोषणस्थळी दाखल
Bachchu Kadu : मराठा आरक्षण प्रश्नी यशस्वी मध्यस्थी नंतर बचु कडू आज जळगाव मध्ये गेल्या पंचवीस दिवस पासून उपोषणास बसलेल्या कोळी समाज कार्यकर्त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी जळगाव मध्ये दाखल झाले आहेत
मराठा आरक्षण प्रश्नावर मनोज जरांगे यांचे उपोषण मागे घेण्यास यशस्वी मध्यस्थी केल्याच्या नंतर प्रहार संघटने चे नेते बच्चू कडू आज जळगाव मध्ये कोळी समाज उपोषण स्थळी दाखल झाले आहेत
गेल्या पंचवीस दिवस पासून कोळी समाज कडून जात वैधता प्रमाणपत्र मिळण्याच्या मागणी साठी जळगाव जिल्हाधिकारी कार्यालय समोर उपोषणाला बसले आहेत आता पर्यंत जळगाव जिल्ह्यातील मंत्री गुलाबराव पाटील मंत्री गिरीश महाजन मंत्री अनिल पाटील यांनी मध्यस्थी करून हे उपोषण सोडण्याचा प्रयत्न केला होता मात्र तो यशस्वी होऊ शकला नाही
अद्याप पर्यंत कोणताही तोडगा निघू शकला नसल्याने बाच्चू कडूं यांच्या माध्यमातून काही मार्ग निघेल अशी आशा कोळी समाज बांधवांना आहे
कोळी समाज उपोषण कर्त्या शी बातचीत केल्या नंतर बचु कडू हे कोळी समाज कार्यकर्त्या सह जिल्हाधिकारी यांच्या दालनात बैठक घेत आहेत
या बैठकीत आता काय निर्णय होतो या कडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे