आरोग्य विभागाच्या नोकरभरती परीक्षेत केद्रांचा घोळ, राज्य सरकारकडून अन्याय - विनोद पाटील
Continues below advertisement
आरोग्य विभागाची परीक्षा राज्यात एकाच वेळी 28 फेब्रुवारीला होणार आहे. रविवारी सकाळी या परीक्षांचे हॉल तिकीट आले. मुलांनी परीक्षांसाठी जे सेंटर दिले होते ते त्यांना न देता 500 किमी दूर त्यांना परीक्षा सेंटर देण्यात आली आहेत. 28 फेब्रुवारीला दोन शिफ्ट मध्ये दोन वेगवेगळे पेपर घेण्यात येणार आहेत. विद्यार्थ्यांचा एक पेपर एका जिल्ह्यात आणि काहीच वेळानंतर होणारा दुसरा पेपर दुसऱ्याच जिल्ह्यात आहे. त्यामुळे दोन्ही पेपरला पोहोचणे अनेकांना शक्य नाही.
Continues below advertisement