Nagpur Nitin Raut | पालकमंत्री नितीन राऊतांविरोधात हक्कभंग प्रस्ताव आणण्याचा निर्णय, आढावा बैठकीला इतर पक्षीय नेत्यांना न बोलावल्याचा आरोप
भाजपचे नागपूर शहर आणि जिल्ह्यातील मिळून 10 आमदार आहेत, काल जी आढावा बैठक पालक मंत्री नितीन राऊत यांनी बोलावली त्यात यापैकी कोणालाही बोलावले गेले नव्हते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना मात्र आमंत्रण होते, पण भाजपचे राज्यसभा खासदार आणि शहराचे महापौर यांनाही आमंत्रण नव्हते. त्यामुळे भाजप आमदारांनी ही विकास आढाव्याची बैठक नसून महाविकास आघाडीचीच बैठक असल्यासारखे झाल्याचा आरोप केला. सरकारच्या जी आर च्या निर्देशांचे थेट उल्लंघन केल्याचा आरोप करत या आमदारांनी नितीन राऊत यांच्या विरोधात हक्कभंग प्रस्ताव आणण्याचा निर्णय घेणार असल्याचं सांगितलं आहे.