Mahad Building Collapsed | महाड इमारत दुर्घटनेतील देवदूत इरफान जोगीलकर! दुर्घटनेपूर्वी अनेकांना केलं सतर्क

इरफान जोगीलकर या तरुणाने इमारत कोसळण्यापूर्वी अनेकांना सतर्क केलं आणि अनेकांना बाहेर पडण्याचं आवाहन केलं. ज्यांनी त्याचं ऐकले ते त्यावेळी बाहेर पडले आणि त्यांचे प्राण वाचले. रायगडमधील इमारत दुर्घटनेत आतापर्यंत पाच जणांचा मृत्यू झाल्याची माहिती राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली. आतापर्यंत एकूण 10 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. ढिगाऱ्याखाली 8 ते 9 लोक अडकल्याची शक्यता आहे. मृतांच्या कुटुंबियांना चार लाखांची नुकसानभरपाई दिली जाईल. तर या दुर्घटनेत जखमी झालेल्या 50 हजार रुपये दिले जातील. इमारतीमधील रहिवाशांच्या राहण्याची आणि जेवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे, असं विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola