Akola : पालिकेच्या तीन वर्षाच्या काराभाराची चौकशी,राज्य सरकारकडून 139 ठराव निलंबित ABP MAJHA

Continues below advertisement

विधानपरिषदेच्या अकोल्याच्या जागेवर महाविकास आघाडीचा पराभव झाला. हा पराभव त्यांच्या जिव्हारी लागलाय की काय अशा चर्चा आता अकोल्यात सुरू झाल्या आहेत. कारण निकालाच्या दुसऱ्याच दिवशी राज्य सरकारनं अकोला महापालिकेतील सत्ताधारी भाजपचं नाक दाबण्यास सुरुवात केलेय. अकोला पालिकेचा २०१८ ते २०२० या तीन वर्षांच्या कालावधीतील कारभाराची राज्य सराकडून चौकशी करण्यात आलेय. या चौकशीनंतर पालिकेचे तीन वर्षात घेतेले तब्बल १३९ ठराव स्थगित करण्यात आले आहेत. या आदेशात आर्थिक अनियमिततेचा ठपका ठेवत तत्कालीन महापौर, आयुक्त आणि नगरसचिव यांच्यावर फौजदारी कारवाी करण्याचे आदेश नगरविकास विभागानं दिले आहेत. पालिकेला उत्तरासाठी महिन्याभराचा कालावधी देण्यात आलाय. विशेष म्हणजे पराभुत आमदार गोपिकिशन बाजोरिया यांनी यासंदर्भात तक्रार केली होती.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram