Ram Mandir | चीनसोबतच्या तणावानंतर अयोध्येत राम मंदिर बांधकामाची तारीख लांबणीवर
Continues below advertisement
नवी दिल्ली : भारत चीन सीमेवर घडलेल्या घटनेचा परिणाम अयोध्येतल्या राम मंदिराच्याही कामावर होताना दिसतोय. कारण सीमेवरच्या वाढत्या तणावामुळे राम मंदिराच्या उभारणीचं काम लांबणीवर टाकण्यात आलं आहे. राम मंदिर ट्रस्टनं अधिकृतपणे ही तारीख पुढे ढकलल्याचं जाहीर केलं आहे. सध्या भारत चीन सीमेवरची स्थिती ही चिंताजनक असून देशाचं रक्षण ही पहिली प्राथमिकता आहे. त्यामुळे काही दिवसांसाठी मंदिर निर्मितीचं काम पुढे ढकललं जात असून स्थितीचा आढावा घेतल्यानंतर नवी तारीख जाहीर केली जाईल असं मंदिर ट्रस्टच्या वतीनं सांगण्यात आलं आहे.
Continues below advertisement