India Corona Update | कोरोनामुळं भारतात चीनपेक्षा अधिक लोकांचा मृत्यू

मुंबई : देशात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. मागील 24 तासात 7 हजार 466 जणांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. तर 175 जणांचा मृत्यू झाला आहे. आरोग्य मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार देशात आता कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 1 लाख 65 हजार 799 झाली आहे. त्यापैकी 4 हजार 706 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 71  हजार 105 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. गेल्या 24 तासात 3 हजार 313 कोराना रुग्ण बरे झाले आहेत. देशाचा रिकव्हरी रेट 42.88 टक्के आहे. सध्या देशात कोरोनाची लागण असलेले म्हणजेच अॅक्टिव्ह रुग्ण 89 हजार 987 आहेत.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola