Space Mission | शुभांशु शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात दाखल; चाळीस वर्षांनंतर भारतीय अंतराळवीर
शुभांशु शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात दाखल झाले आहेत. राकेश शर्मा यांच्यानंतर अंतराळात पोहोचलेले दुसरे भारतीय आहेत शुभांशु शुक्ला. अमेरिकेच्या अंतराळ मोहिमेतून ते सध्या अंतराळात पोहोचले आहेत. भारताच्या गगनयान मोहिमेसाठी हा महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. शुभांशु शुक्ला हे इंडियन एअरफोर्सचे पायलट आहेत आणि त्यांनी सुखोई आणि मिग या फाइटर विमानांचे टेस्ट पायलट म्हणून काम केले आहे.