Raj Thackeray Full PC : 6 जुलैला ठाकरे बंधू एकत्र दिसणार? हिंदीवरुन सरकारला घाम फोडणार?

Continues below advertisement

Raj Thackeray Full PC : 6 जुलैला ठाकरे बंधू एकत्र दिसणार? हिंदीवरुन सरकारला घाम फोडणार?

राज्यात इयत्ता पहिलीपासून तिसरी भाषा म्हणत अप्रत्यक्षपणे हिंदी भाषेची सक्ती करण्यात येत असल्याचा दावा करत राज्य सरकारच्या शिक्षण धोरणाला मनसेनं (MNS) थेट विरोध केला. त्यानंतर, राज्य सरकारने एक पाऊल मागे घेत आज शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची भेट घेतली. या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना राज ठाकरेंनी आम्हाला शासनाची भूमिका अजिबात मान्य नाही. सरकारने पटवून देण्याचा विषयच येत नाही, आम्हाला भूमिका मान्य नाही असे राज ठाकरेंनी स्पष्टपणे सांगितले. तसेच, सरकारच्या या निर्णयाविरुद्ध सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र येण्याचे आवाहनही राज ठाकरेंनी केले आहे. तर, 6 जुलै रोजी मराठी (Marathi) माणसांचा हा मोर्चा गिरगावहून निघेल, अशी घोषणाही राज ठाकरेंनी केली.  

महाराष्ट्र राज्याचे शिक्षण मंत्री आता येऊन गेले त्यांची भूमिका त्यांनी स्पष्ट केली. मी पूर्णपणे भूमिका फेटाळून लावली असून आम्हाला हे मान्य नसल्याचे सांगितले. खरतर 5 वी नंतरच पर्यायी भाषेचा मुद्दा आहे, त्यांना हेही सांगितले की NEP मध्ये असे काही नाही हे राज्यांवर टाकले आहे, मग ते का करत नाहीत, असा सवाल राज यांनी उपस्थित केला. तर, सीबीएसई या शाळा आल्या त्या आयएएस अधिकाऱ्यांसाठी काढण्यात आल्या आहेत. त्या शाळेच वर्चस्व करण्याचे सुरू आहे आणि महाराष्ट्र हे का करत आहे? बाकी राज्य काही अशी भूमिका घेत नाही. आमचा या संपूर्ण प्रकरणाला विरोध आहे, असेल आणि राहणार असल्याचेही राज ठाकरेंनी स्पष्ट केले.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola