COVID-19 Vaccine : 'Zycov-D'ला आपातकालीन वापरास DGCIची परवानगी,12 वर्षांवरील मुलांना लस घेता येणार

Continues below advertisement

लहान मुलांचं लसीकरण कधी सुरु होणार याची देशभरातल्या पालकांना प्रतीक्षा आहे आणि ही प्रतीक्षा लवकरच संपण्याची चिन्ह आहेत. कारण डीजीसीआयनं झायडस कॅडिला कंपनीच्या ‘झायकोव्ह-डी’ लशीला आपत्कालीन वापरासाठी मंजुरी दिली आहे.  त्यामुळं भारतात परवानगी मिळालेल्या लशीची संख्या सहावर पोहचली आहे. दरम्यान ‘झायकोव्ही-डी’ लस बारा वर्षांवरच्या मुलांना दिली जाऊ शकते. दरम्यान, आरोग्य विभागानं १२ वर्षांवरच्या मुलांच्या लसीकरणाचा अद्याप कार्यक्रम जाहीर केलेला नाही.  त्यामुळं मुलांचं लसीकरण कधी सुरु होणार हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. ‘झायकोव्ही-डी’ लशीचं महत्त्वाचं वैशिष्टय म्हणजे ही जगातली पहिली डीएनए बेस्ड लस आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram