#Congress युवक काँग्रेसचं महागाई आणि भ्रष्टाचाराविरोधात सत्यजित तांबेंच्या नेतृत्वात आंदोलन

Continues below advertisement

एकीकडे पेगासिस प्रकरणाच्या मुद्द्यावरून विरोधकांनी संसद बंद पाडली आहे तर दुसरीकडे युवक काँग्रेस महागाई आणि भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर संसद घेराव करत आहे.. राजधानी दिल्लीमध्ये आज देशभरातल्या युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी महागाई आणि भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर हे आंदोलन आयोजित केलं. या आंदोलनासाठी महाराष्ट्र युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रातले ही तरूण कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात सहभागी झाले.. जोपर्यंत मोदी सरकारला या मुद्द्यावर जाग येत नाही तोपर्यंत युवक काँग्रेस रस्त्यावर लढत राहील असा इशारा यावेळी कार्यकर्त्यांनी दिला... संसदेपासून अवघ्या काही मीटर अंतरावर युवक काँग्रेसच्या या आंदोलनामुळे राजधानी दिल्लीत राजकीय हवा चांगलीच तापलेली दिसली.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram