Padma Shriaward : 125 वर्षाच्या या 'योग सेवका'ला पद्मश्री देण्यासाठी स्वत: राष्ट्रपतींनी खुर्ची सोडली

Swami Sivananda :   'योग सेवक' या नावाने प्रसिद्ध असलेल्या वाराणसीमधील 125 वर्षांच्या स्वामी शिवानंद यांना आज पद्मश्री या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. हा पुरस्कार घेण्यासाठी उठलेल्या स्वामी शिवानंद यांनी प्रथम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दंडवत घातलं. नंतर त्यांनी राष्ट्रपतींना दंडवत घातलं. स्वामी शिवानंद यांना पुरस्कार देण्यासाठी राष्ट्रपती रामनाथ कोविंद स्वत: जागेवरुन उठून त्यांच्याजवळ आले आणि त्यांना हा पुरस्कार प्रदान केला. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होताना दिसतोय.  

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola