Rajasthan Politics सचिन पायलट यांना महासचिवपद मिळणार?प्रियांका गांधींची गहलोत-पायलटांशी चर्चा- सूत्र

राजस्थानचे उपमुख्यमंत्री आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सचिन पायलट काँग्रेस सोडणार की नाही नाही याबाबत संभ्रमाचं वातावरण आहे. कारण सचिन पायलट काँग्रेसला रामराम करुन भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा रंगली आहे. मात्र आपण भाजपमध्ये प्रवेश करणार नाही, असं स्पष्टीकरण खुद्द सचिन पायलट यांनीच दिलं आहे. एबीपी न्यूजच्या प्रतिनिधीने सचिन पायलट यांच्याशी संवाद साधला, त्यावेळी पायलट यांनी हे स्पष्ट केलं. प्रियांका गांधी या अशोक गहलोत आणि सचिन पायलट यांच्यात मध्यस्थी करत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola