New Delhi : देवेंद्र फडणवीस आणि अमित शाहांच्या भेटीबाबत गुप्तता का? Maharashtra Politics

नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची दिल्लीत गुप्त भेट झाल्याची माहिती आहे. त्याआधी आशिष शेलार आणि अमित शाहांसोबत स्वतंत्र बैठक झाली आहे. आधी देवेंद्र फडणवीस त्यानंतर आशिष शेलार अमित शाह यांना भेटले. यानंतर आता उद्यापासून प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील चार दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर आहेत. भाजप नेत्यांच्या या बैठकांमुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात अनेक चर्चा सुरु झाल्या आहेत. भाजप नेत्यांच्या अमित शाह यांच्या सोबतच्या स्वतंत्र बैठकांचा नेमका अर्थ काय? असा सवालही उपस्थित होत आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola