
WHO on Omicron : ओमायक्रॉनकडे दुर्लक्ष नको, गांभीर्यानं घ्य़ा; जागतिक आरोग्य संघटनेचा इशारा ABP Majha
Continues below advertisement
भारतात कोरोनाची त्सुनामी सुरु झालीय. तर जगभरातल्या अनेक देशांत ओमायक्रॉनची अशी लाट आधीच आलीय. या पार्श्वभूमीवर जागतिक आरोग्य संघटनेनं ओमायक्रॉनकडे दुर्लक्ष करू नका, गांभीर्यानं घ्या असा सल्ला दिलाय. ओमायक्रॉनमुळे लोक रुग्णालयांत दाखल होतायत आणि अनेकांचा जीवही जातोय असं जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलंय. जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक डॉक्टर टेड्रोस यांनी काल याबाबत माहिती दिली. डेल्टाच्या तुलनेत ओमायक्रॉन कमी गंभीर आहे, पण त्याकडे दुर्लक्ष करू नका, असा इशारा त्यांनी दिला. लसीकरण झालेल्यांनाही ओमायक्रॉनची लागण होतेय, पण अशा रुग्णांना त्याचा धोका कमी आहे, असंही त्यांनी सांगितलं.
Continues below advertisement