WhatsApp vs Centre : केंद्र सरकारविरोधात WhatsApp ची हायकोर्टात धाव
केंद्र सरकारने सोशल मीडियाच्या संदर्भात तयार केलेल्या नियमांचे पालन करण्यासाठी कंपन्यांना दिलेली वेळ मर्यादा संपली आहे. आता या सोशल मीडिया कंपन्यांविरोधात कारवाई होणार का ही उत्सुकता असताना व्हॉट्सअॅपने या नियमावलीच्या विरोधात दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. केंद्र सरकारच्या या नियमावलीमुळे यूजर्सची प्रायव्हसी धोक्यात येत असल्याने या नियमांना स्थगिती द्यावी अशी मागणी व्हॉट्सअॅपने केली आहे.