Congress मध्ये नेमकं चाललंय काय? अंतर्गत कलहातून काँग्रेसमध्ये पुन्हा फूट पडणार?
नवी दिल्ली : देशात पंजाब, छत्तीसगढ, राजस्थान अशा मोजक्या राज्यांमध्ये काँग्रेसचे मुख्यमंत्री आहेत. पण या तीनही राज्यांमध्ये अंतर्गत संघर्षातच काँग्रेस बेजार होताना दिसतेय. सध्या दिल्लीत एकाचवेळी पंजाब आणि छत्तीसगढमधल्या अंतर्गत संघर्षानं काँग्रेस मुख्यालयाचं वातावरण तापलेलं आहे.
मला निर्णय करण्याचं स्वातंत्र्य द्या, नाहीतर पक्षाचं वाटोळं होईल..नवज्योतसिंह सिद्धू यांनी आपल्याच पक्षाला हा इशारा दिलाय.तर दुसरीकडे पंजाब काँग्रेसचे मनीष तिवारी विचारतायत सिद्धु यांनी केलं की सगळं माफ कसं, आणि आम्ही जरा आवाज केल्यावर आमची कारवाई का..