What are Radioactive substances ? : किरणोत्सारी पदार्थ म्हणजे काय ? यांचा वापर नेमका कुठे होतो?
मूलद्रव्यांच्या अणुगर्भांच्या (अणुकेंद्रांच्या) अस्थिरतेमुळे विघटन (फुटण्याची क्रिया) होते आणि त्यामुळे काही किरणांचं उत्सर्जन होतं, याला किरणोत्सर्ग म्हणतात
युरेनियम, थोरियम, रेडिअम यांसारख्या मूलद्रव्यांमध्ये अदृश्य, अतिशय भेदक आणि उच्च दर्जा असणारी प्रारणे उत्स्फूर्तपणे उत्सर्जन करण्याचा गुणधर्म असतो त्याला 'किरणोत्सार' (Radiation) असे म्हणतात. हा गुणधर्म असणाऱ्या पदार्थांस 'किरणोत्सारी पदार्थ' असे म्हणतात.
किरणोत्सारी पदार्थातून बाहेर पडणारी प्रारणे तीन प्रकारची असतात: अल्फा, बीटा आणि गॅमा
कॅलिफोर्नियम सारखे किरणोत्सारी पदार्थ माणसांसाठी अत्यंत धोकादायक असतात
रेडिओ अॅक्टिव्ह पदार्थ अतिशय महाग असतात, उदा. कॅलिफोर्नियम नावाच्या रेडिओअॅक्टिव्ह पदार्थाची किंमत १७ कोटी प्रति ग्रॅम असते
किरणोत्सारी पदार्थांचा वापर कशात होतो?
अण्विक शस्त्रे, डिटोनेटर्समध्ये किरणोत्सारी पदार्थाचा वापर
औद्योगिक क्षेत्रात धातुकामातील दोष शोधण्यासाठी रेडिओग्राफी वापरतात
जाडी, घनता,पातळी यांचे मापन करण्यासाठी किरणोत्सारी पदार्थाचा उपयोग करतात
घड्याळाचे काटे, विशिष्ट वस्तू अंधारात दिसण्यासाठी रेडीअम ,प्रोमेथिअस, ट्रिटीअम पदार्थाचा वापर करतात
सिरॅमिक वस्तूंमध्ये किरणोत्सारी पदार्थाचा वापर
कृषी क्षेत्रात रोपांची जलद वाढ होण्यासाठी व अधिक उत्पन्न मिळविण्यासाठी किरणोत्सारी पदार्थांचा उपयोग
अन्नपरिक्षणात उपयोग होतो
विविध पिकांवरील संशोधनात उपयोग होतो
वैद्यकशास्त्रात हाडांचा कर्करोग , हायपर थॉयरॉइडिझम तसेच ट्युमर ओळखणे यांमध्ये केला जातो