West Bengal : पश्चिम बंगालमध्ये ईडीने मोठ्या कारवाईनंतर तिथले मंत्री पार्थ चॅटर्जी यांना अटक

West Bengal  : पश्चिम बंगालमध्ये ईडीने मोठ्या कारवाईनंतर तिथले मंत्री पार्थ चॅटर्जी यांना अटक करण्यात आलीय. पश्चिम बंगालमध्ये शिक्षक भरती, तसेच 'क' आणि 'ड' श्रेणीतील कर्मचाऱ्यांच्या भरतीतील घोटाळा प्रकरणात ईडीने मोठी कारवाई केलीय.. या कारवाईत तब्बल २० करोड रुपयांची रोकड ईडीने जप्त केली आहे..  या प्रकरणात दोन मंत्री आणि काही अधिकाऱ्यांशी संबंधित १३ मालमत्तांवर ईडीनं छापे टाकले. त्यात ही रक्कम जप्त करण्यात आलीय. ईडीच्या छाप्यात पैशांचा अक्षरशः ढिग सापडलाय.... त्यानंतर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे विश्वासू मानले जाणारे राज्याचे वाणिज्य आणि उद्योगमंत्री पार्थ चॅटर्जी यांना ईडीनं अटक केली. चॅटर्जी यांनी यापूर्वी शिक्षण मंत्री म्हणूनही काम केलं आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola