West Bengal : पश्चिम बंगाल विधानसभेत जोरदार राडा, भाजपाच्या पाच आमदारांचं निलंबन
West Bengal : पश्चिम बंगाल विधानसभेत जोरदार राडा झाला.. भाजपा आणि तृणमूल काँग्रेसच्या आमदारांमध्ये यावेळी जोरदार हाणामारी झाली. यावेळी भाजपा आमदार मनोज तिग्गा यांना मारहाण करण्यात आल्याचा आरोप आहे. तर तृणमूलचे आमदार असित मजुमदार यांनी हाणामारीत आपण जखमी झाल्याचा दावा केलाय. बीरभूम जळीतकांड प्रकरणावर चर्चेची मागणी करत असताना तृणमूलच्या सदस्यांनी मारहाण केल्याचा आरोप भाजपने केलाय. या गदारोळ प्रकरणी भाजपाच्या पाच आमदारांचं निलंबन करण्यात आलंय.