Inflation : 1 डिसेंबरपासून टीव्ही पाहणं महागणार! चॅनेल्स पाहण्यासाठी 50 टक्के अधिक खर्च करावा लागणार
जर तुम्हाला टीव्ही पाहण्याची आवड असेल तर तुमचा खर्चाचा बोजा वाढणार आहे. कारण, 1 डिसेंबरपासून टीव्ही चॅनल्सची बिले वाढणार आहेत. देशातील प्रमुख ब्रॉडकास्टिंग नेटवर्क्स झी, स्टार, सोनी आणि Viacom18 ने काही चॅनल्स आपल्या बुकेतून बाहेर काढले आहेत. त्यामुळे टीव्ही पाहणाऱ्या ग्राहकांना 50 टक्क्यांपर्यंत अधिक खर्च करावा लागू शकतो. टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडियाच्या (TRAI) नवीन दर आदेशाच्या अंमलबजावणीमुळे या किंमती वाढत आहेत.