Ola Strike : संघटनांचा बंदचा इशारा, ॲपवर आधारित वाहतूक नियमावली कधी होणार?
ॲप आधारीत वाहतुकीबाबत गेल्या काही महिन्यांपासून प्रवासी आणि चालकांच्या अनेक तक्रारी समोर येत आहेत. ॲपवर आधारित वाहतुकीसाठी सरकार प्रशासनाकडून समितीने नेमून नियमावलीचे काम सध्या सुरू आहे. त्यातच आता काही संघटनांनी ॲपवर आधारित वाहतूकदारांच्या काही मागण्यांसाठी ऐन सणासुदीच्या काळात बंद करण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे अॅपवर आधारित वाहतूक नियमावली कधी होणार? असा प्रश्न विचारला जात आहे... राज्यात गेल्या काही दिवसांपासून स्थानिक रिक्षा चालक आणि अॅप आधारीत टॅक्सी, बाईक सेवा पुरवणारी कंपन्या यांच्यात वाद सुरू आहे. मुंबई, ठाण्यातही ओला, उबेर या कंपन्या आणि टॅक्सी, रिक्षा चालक यांच्यात अधून मधून वाद होत आहेत. तसेच त्यामुळे ॲपवर आधारित चालक-मालक संघटना आणि प्रवासी देखील संतप्त आहेत.