Zero Hour LIVE : कुख्यात गुंड गजा मारणेसोबत पोलिसांची मटण पार्टी, महाराष्ट्राचे पोलीस नेमके कुणाचे?
Zero Hour LIVE : कुख्यात गुंड गजा मारणेसोबत पोलिसांची मटण पार्टी, महाराष्ट्राचे पोलीस नेमके कुणाचे?
कुख्यात गुंड गजा मारणे पोलीस संवरक्षणात असताना त्याचासोबत मटण पार्टी केलेल्या एका पोलीस अधिकाऱ्यासोबतच चार पोलीस कर्मचाऱ्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. कोथरुडमध्ये मुरलीधर मोहोळ यांच्या निकटवर्तीयाला मारहाण केल्याच्या प्रकरणानंतर गजा मारणेवर मोक्का कारवाई करण्यात आली त्यानंतर त्याला पुण्यातील येरवडा कारागृहात ठेवण्यात आल होत. मात्र काही दिवसांनी त्याची रवानगी सांगली कारागृहात करण्याचा निर्णय घेतला. पोलीस संवरक्षणात त्याला सांगलीला नेट असताना क कनसे धाब्यावर पोलिसांनी मटण पार्टी केली होती. याचा कानोसा पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना लागल्यांनंतर त्यांनी cctv चेक केले. त्यावेळी हा सगळा प्रकार समोर आला. सोबतच गजा मारणेला भेटायला दोन फॉर्च्युनर आणि एक थार गाडीतून भेटायला आलेल्या तिघांवरदेखील गुन्हा दाखल केला आहे.