Uttar Pradesh मध्ये तापाची साथ, मुलांचे प्राण वाचवण्यासाठी पालकांची तळमळ, मन हेलावून टाकणारा व्हिडीओ
Continues below advertisement
तापामुळं होणाऱ्या मृत्यूची संख्या वाढल्यानं उत्तरप्रदेशातील जनता भितीच्या सावटाखाली जगतेय. विशेष म्हणजे या तापामुळं अनेक चिमुकल्यांनाही त्यांचे प्राण गमवावे लागले आहेत. मुलांचे प्राण वाचावेत म्हणून सर्वसामान्य वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या चक्क हातापाय पडत आहेत. मथुरामध्ये पोहोचलेल्या महिला वैद्यकीय अधिकाऱ्याच्या पायावर पडून मुलाचे प्राण वाचवण्यासाठी प्रार्थना करणाऱ्या एका वृद्धाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
Continues below advertisement