Rain Update : मुंबई, उपनगरांत आज मुसळधार पावसाचा इशारा, राज्यातील 15 जिल्ह्यांना 'यलो अलर्ट'
Continues below advertisement
Maharashtra Rain Update : पुढील चार दिवस राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मुंबई आणि लगतच्या उपनगरांत आज मुसळधार आणि उद्या अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. बंगालच्या उपसागरांत तयार होणाऱ्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळं पुढच्या चार दिवसांत राज्यातील काही भागांत विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कोकण, मराठवाडा, विदर्भासह राज्यातील 15 जिल्ह्यांना हवामान विभागाकडून यलो अलर्ट दिला आहे.
Continues below advertisement