Vinesh Phogat Disqualification Loksabha : विनेशच्या अपात्रतेनंतर क्रिडामंत्री जवाब दो म्हणत लोकसभेत गदारोळ

Continues below advertisement

Vinesh Phogat Disqualification Loksabha : विनेशच्या अपात्रतेनंतर क्रिडामंत्री जवाब दो म्हणत लोकसभेत गदारोळ

भारतीय कुस्तीपटू विनेश फोगटला निर्धारित श्रेणीत जास्त वजन असल्यामुळे पॅरिस ऑलिम्पिकमधून बाहेर पडावं लागलं आहे. विनेश 50 किलो गटात खेळते. तथापि, बुधवारी विनेशचे वजन 100 ग्रॅमपेक्षा जास्त असल्याचे आढळून आल्याने ऑलिम्पिक महिला कुस्तीतून अपात्र ठरवण्यात आलं आहे. त्यामुळे देशभरात खळबळ उडाली आहे. संसदेतही रणकंदन सुरु झालं आहे. विनेशविरोधात कट करण्यात आल्याचा आरोप कुटुंबीयांकडून होत आहे.

निर्णयाविरोधात अपील होण्याची शक्यता कमीच 

भारतीय ऑलिम्पिक संघटनेने विनेशच्या अपात्रतेला दुजोरा दिला आहे. आज रात्री होणाऱ्या 50 किलो गटातील महिला कुस्तीची अंतिम फेरी ती खेळू शकणार नाही. पदकही मिळणार नाही. दरम्यान, दैनिक भास्करने दिलेल्या वृत्तानुसार सर्वात कठीण गोष्ट म्हणजे या निर्णयावर अपीलही करता येत नाही. विनेश पहिल्यांदाच 50 किलो गटात खेळत होती. यापूर्वी ती 53 किलोमध्ये खेळायची. मात्र, तो वजनगट नसल्याने वजन कमी केलं होतं. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram