Jammu : वैष्णो देवी दुर्घटनेवर 'माझा'चे सवाल, चेंगराचेंगरीला जबाबदार कोण?
जम्मूमध्ये कटरा इथल्या वैष्णो देवी मंदिर परिसरात चेंगराचेंगरी झालीय. या चेंगराचेंगरीत 2 महिलांसह 12 भाविकांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळतेय. नववर्षाचं स्वागत देवीच्या दर्शनाने करण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती. त्याचवेळी रात्री दीड ते दोनच्या सुमारास ही चेंगराचेंगरी झालीय. या दुर्घटनेत अनेक जण जखमी झालेत. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेवर दुःख व्यक्त केलंय. या दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना २ लाख रुपये तर जखमींना 50 हजार रुपये मदतीची घोषणा पंतप्रधान मोदींनी केलीय.
Tags :
Vaishno Devi Mandir Vaishno Devi Temple News Vaishno Devi Temple Breaking News Vaishno Devi News In Hindi Vaishno Devi News Update Vaishno Devi Dham Me Machi Bhagdad Vaishno Devi Bhagdad News Stampede At Mata Vaishno Devi Bhawan