Uttarkashi Rescue Operation : पहिल्या 30 मिनिटांत 17 मजुर बाहेर, पाहा आतापर्यंतच रेस्क्यू ऑपरेशन

Continues below advertisement

Uttarkashi Rescue Operation : पहिल्या 30 मिनिटांत 17 मजुर बाहेर, पाहा आतापर्यंतच रेस्क्यू ऑपरेशन
Uttarkashi Tunnel Rescue Operation :
 उत्तराखंडमधील (Uttarakhand) उत्तरकाशी (Uttarkashi) इथं बोगद्यात अडकलेल्या मजुरांची अखेर सुटका करण्यात आली. या बोगद्यात 41 कामगार अडकले होते, त्यांची 17 दिवसांनी सुटका करण्यात आली. बोगद्यात अडकलेल्या या कामगारांची सुटका झाली आणि त्यांच्या कुटुंबीयांनी तसेच प्रशासनाने सुटकेचा निश्वास टाकला. बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी रुग्णवाहिकांचा ताफा आणि तात्पुरतं रुग्णालय सज्ज ठेवण्यात आलं आहे.  गेल्या 12 नोव्हेंबरपासून म्हणजेच 17 दिवसांपासून तब्बल 41 मजूर बोगद्यात अडकून पडले होते. तेव्हापासून या मजुरांच्या सुटकेसाठी दिवसरात्र रेस्क्यू ऑपरेशन सुरु होतं. उत्तरकाशीतील (Uttarkashi) सिल्क्यारा बोगद्यात (Silkyara Tunnel) 41 कामगार अडकल्याने देशासह जगाच्या नजरा या रेस्क्यू ऑपरेशनकडे लागल्या होत्या.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram