UP Hathras Stampede : भोले बाबाच्या सत्संगादरम्यान चेंगराचेंगरी, 75 पेक्षा अधिक भाविकांचा मृत्यू
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppUP Hathras Satsang Stampede : उत्तर प्रदेशात (Uttar Pradesh) मोठी दुर्घटना घडली आहे. हाथरसमध्ये चेंगराचेंगरी (Hathras Stampede) होऊन 75 जणांचा मृत्यू झाला आहे. उत्तर प्रदेशच्या हाथरसमध्ये सत्संगात चेंगराचेंगरी होऊन भीषण दुर्घटना घडली असून यामध्ये 75 जणांचा मृत्यू झाला असून अनेक लोक जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भोले बाबांचा सत्संग कार्यक्रम सुरु होता यावेळी अचानक चेंगराचेंगरी झाली. उत्तर प्रदेशच्या हाथरसमधील रतिभानपूर येथे ही दुर्घटना घडल्याची माहिती आहे. या सत्संगाचा समारोप कार्यक्रम सुरु होता. यावेळी ही दुर्घटना घडली आहे.
हाथरसमध्ये चेंगराचेंगरी होऊन मोठी दुर्घटना
उत्तर प्रदेशातील हाथरसमध्ये चेंगराचेंगरीची घटना घडली आहे. चेंगराचेंगरीत अनेकांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. जिथे ही चेंगराचेंगरी झाली तिथे सत्संग सुरु होता. ही घटना हाथरसच्या रतिभानपूर भागातील असल्याची माहिती आहे. भोले बाबांच्या सत्संगाचा समारोप सोहळा सुरू असतानाच चेंगराचेंगरी झाल्याचं सांगण्यात येत आहे. या चेंगराचेंगरीत जखमी झालेल्या लोकांना उपचारासाठी एटा मेडिकल कॉलेजमध्ये नेण्यात आलं आहे.