परराज्यातील कामगार, मजुरांना त्यांच्या घरी परतण्यासाठी स्पेशल ट्रेनची सोय करावी, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारकडे केली होती. मुख्यमंत्र्यांच्या या मागणीवर एबीपी माझाशी बोलताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं की, मुख्यमंत्र्यांच्या सल्लाचा आम्ही सन्मान करतो. मात्र सध्याच्या परिस्थितीत तसे करणे अयोग्य ठरेल.