New Education Policy 2020 | 34 वर्षानंतर शैक्षणिक धोरणात बदल, नव्या धोरणानुसार सेमीस्टर पॅटर्नवर भर
Continues below advertisement
देशात नवीन शिक्षण धोरण मंजूर झाले आहे. आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत नवीन शिक्षण धोरण मंजूर झाले आहे. 34 वर्षानंतर देशाच्या शैक्षणिक धोरणात बदल करण्यात आला. बैठकीत नव्या शिक्षण धोरणाविषयी सविस्तर माहिती देण्यात आली आहे. यावेळी केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर, केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल निशंक देखील उपस्थित होते.
Continues below advertisement