Udhayanidhi Stalin on Language War: हिंदी लादली तर लँग्वेज वॉर पुकारु,त्रिभाषा सूत्राला कडाडून विरोध

Continues below advertisement

Udhayanidhi Stalin on Language War: हिंदी लादली तर लँग्वेज वॉर पुकारु,त्रिभाषा सूत्राला कडाडून विरोध

ABP Southern Rising Summit 2025 चेन्नई: केंद्र सरकारने हिंदीसक्ती (Hindi Language) करण्याचा प्रयत्न केला, तर त्याला कठोर विरोध केला जाईल, असा इशारा तमिळनाडूचे उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन (Udhayanidhi Stalin) यांनी दिला आहे. तसेच द्रविड मुनेत्र कळघम (DMK) पक्ष “भाषा युद्ध” लढायलाही तयार असल्याचं उदयनिधी स्टॅलिन म्हणाले. उदयनिधी स्टॅलिन चेन्नईत झालेल्या ABP Network च्या Southern Rising Summit 2025 मध्ये बोलत होते. 

देशात सत्ताकेंद्रितीकरण वाढत आहे” आणि राज्यांच्या अधिकारांना धोका निर्माण होत आहे. जर हिंदी आमच्यावर लादली गेली, तर तमिळनाडू भाषा युद्धासाठी तयार आहे. आम्ही नेहमीच आमची भाषा, आमचे राज्याचे हक्क, लोकशाही आणि आता जनतेच्या मतदानाच्या अधिकाराचे संरक्षण केले आहे, असं उदयनिधी स्टॅलिन म्हणाले. दरम्यान, महाराष्ट्रात मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) आणि माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी त्रिभाषा सूत्रावरुन कडाडून विरोध केला होता. तसेच महाराष्ट्रातील हिंदीसक्तीविरोधात मोठं आंदोलनही पुकारलं होतं. त्यामुळे ठाकरेंच्या हिंदीसक्तीविरोधाला दक्षिणेचंही बळ मिळाल्याचं दिसून येतंय.

उदयनिधी स्टॅलिन यांची केंद्रातील भाजपा सरकारवर टीका- (Udhayanidhi Stalin)

भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार जाणूनबुजून संघराज्यव्यवस्था कमकुवत करत आहे. आर्थिकदृष्ट्या सक्षम राज्यांना राजकीयदृष्ट्या कमजोर करणे आणि राजकीयदृष्ट्या सक्षम राज्यांना आर्थिकदृष्ट्या कमजोर करणे हा त्यांचा उद्देश आहे, असा आरोपही उदयनिधी स्टॅलिन यांनी केला आहे. तमिळनाडूवर अन्यायकारक कर-वाटप, निधी अडवणे किंवा विलंब, केंद्र सरकारने लादलेल्या योजना, नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरण आणि आता प्रस्तावित मतदारसंघ पुनर्रचना (delimitation) यांचा परिणाम होत असल्याचंही उदयनिधी स्टॅलिन म्हणाले. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola