Jammu Kashmir : कलम 370 हटवण्याच्या निर्णयाला दोन वर्ष पूर्ण, श्रीनगरच्या जामिया मशिदीजवळ स्फोट, गोळीबार

जम्मू काश्मीरला विशेष दर्जा असलेलं कलम 370 हटवण्याच्या निर्णयाला आज दोन वर्षे पूर्ण झालीत. या निर्णयामुळे काश्मीरसाठी वेगळा झेंडा आणि वेगळे कायदे रद्द झाले. काश्मीरच्या नागरिकांचं दुहेरी नागरिकत्व संपुष्टात आलं आणि जम्मू काश्मीरमध्ये जमीन खरेदी करण्याचा अधिकार सर्व भारतीयांना मिळाला. या दोन वर्षांत काश्मीरमधल्या दगडफेकीच्या घटना कमी झाल्या आणि दहशतवाद्यांच्या कारवायादेखिल कमी झाल्या. याशिवाय काश्मिरी नागरिक भारतीयांच्या आणखी जवळ आले. मोदी सरकारच्या या ऐतिहासिक निर्णयाला दोन वर्षे पूर्ण झाल्यानंतर एबीपी माझानं काश्मीरमध्ये जाऊन तिथल्या परिस्थितीचा आढावा घेतला.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola