Delhi Terrorist Arrested | जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक, दिल्ली पोलिसांची कारवाई
Continues below advertisement
मुंबई : राजधानी दिल्ली आणि आजूबाजूच्या परिसरात दहशतीचे कट पुन्हा एकदा उघड झाले आहेत. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक केली आणि त्यांच्या ताब्यात असलेल्या शस्त्रास्त्रांसह अनेक महत्त्वाची कागदपत्रे हस्तगत केली आहेत. सुरुवातीच्या चौकशीदरम्यान हे दहशतवादी देवबंद येथे ही गेले होते आणि नेपाळमार्गे पाकिस्तानमध्ये विशेष दहशतवादी प्रशिक्षण घेण्यासाठी जाणार होते अशी माहिती मिळाली आहे. त्यांच्याकडून जप्त करण्यात आलेल्या मोबाईलवरून अनेक महत्त्वपूर्ण खुलासे झाले आहेत.
Continues below advertisement