Namaste Trump | अमेरिका भारताला अत्याधुनिकअपाचे हेलिकॉप्टर विकणार
जगातील सर्वात बलशाली राष्ट्राचे अध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प आज भारतात दाखल होत आहेत. ट्रम्प यांच्यासह त्यांचं संपूर्ण कुटुंब भारत दौऱ्यावर येत आहे. ११.४० वाजता ट्रम्प अहमदाबाद विमानतळावर पोहोचणार आहेत. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी ट्रम्प यांचं स्वागत करतील. तिथं ट्रम्प यांना गार्ड ऑफ ऑनर दिल्यानंतर भव्य रोड शो होणार आहे.