देशाचा अर्थसंकल्प डिजिटल स्वरुपात! यंदा देशातलं पहिलच पेपरलेस बजेट
येत्या 1 फेब्रुवारीला देशाचा अर्थसंकल्प सादर होतोय. कोरोनाच्या संकटकाळात सादर होणारा हा अर्थसंकल्प असल्यानं तो अनेक अर्थांनी वैशिष्ट्यपूर्ण असेल. पण त्यातही या बजेटला एक गोष्ट पहिल्यांदाच होणार आहे. हे देशाचं पहिलं पेपरलेस बजेट असेल. देशाचा अर्थसंकल्प म्हणजे अत्यंत महत्वाचा दस्ताऐवज...पण यंदा या बजेटबाबत एक अभूतपूर्व गोष्ट घडणार आहे. स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच असं होईल की बजेट छापलंच जाणार नाही. तर ते केवळ डिजीटल स्वरुपात उपलब्ध असेल. बजेटची साँफ्ट कॉपी खासदार आणि इतर संबंधितांना वाटली जाईल. कोरोनामुळे हा निर्णय घेतल्याचा सरकारचा दावा आहे.