भारतात Corona ची तिसरी लाट येणार, देशात दररोज 4 ते 5 लाख रुग्ण आढळतील नीती आयोगाचा अंदाज : ABP Majha

Continues below advertisement

कोविड 19 लसीसाठी बूस्टर डोसचा विचार अद्याप केंद्र सरकारने केला नसल्याची माहिती शनिवारी, नीती आयोगाचे सदस्य (आरोग्य) व्ही के पॉल यांनी दिली आहे. लसीकरणावरील राष्ट्रीय तांत्रिक सल्लागार गटाचा हवाला देऊन सांगितले की, या संदर्भात अशी कोणतीही शिफारस जारी केलेली नाही.

 

कोविड लसीच्या बूस्टर डोसची सध्या गरज नाही
व्ही के पॉल यांनी टाइम्स ऑफ इंडिया वृत्तपत्राला सांगितले, की "बूस्टर डोसची वेळ आणि आवश्यकता यामागील विज्ञान अजूनही विकसित होत आहे. कंपन्यांनुसार लसीच्या दोन डोसमधील अंतर वेगवेगळे आहे. यावर बारकाईने लक्ष ठेवले जात असून संशोधन केलं जात आहे." ते पुढे म्हणाले की भारतातील प्रौढ लोकसंख्येला लसीचे दोन डोस देऊन लसीकरण करणे ही आतापर्यंतची मोठी चिंता आहे. सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे अध्यक्ष सायरस पूनावाला यांच्या प्रतिक्रियेला उत्तर देताना पॉल म्हणाले की, जगातील काही देशांनी बूस्टर डोस देऊन लसीकरण सुरू केलं आहे. जागतिक आरोग्य संघटनेचा हवाला देत त्यांनी असेही म्हटले आहे की या विषयावर अद्याप कोणतीही शिफारस जारी केलेली नाही.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram