टीम इंडियाच्या माजी कर्णधार सौरव गांगुलीला ह्रदयविकाराचा सौम्य झटका, व्यायाम करताना बिघडली प्रकृती
Continues below advertisement
कोलकाता : बीसीसीआयचे अध्यक्ष आणि टीम इंडियाचे माजी कर्णधार सौरव गांगुली यांना ह्रदयविकाराचा सौम्य झटका आल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तब्येत अचानक बिघडल्यामुळे त्यांना कोलकाताच्या वुडलँड्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, व्यायामशाळेत व्यायाम करताना त्याची तब्येत बिघडली आहे. हात आणि पाठीत दुखत असल्याने आणि डोळ्यासमोर अंधारी आल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
Continues below advertisement
Tags :
Saurav Ganguly Attack Sourav Dada Sourav Ganguly Heart Attack Kolkata Saurav Ganguli Sourav Ganguly West Bengal Saurav Ganguly BJP