Tarun Tejpal : तहलकाचे माजी संपादक तरुण तेजपाल यांची बलात्काराच्या आरोपातून निर्दोष मुक्तता
Continues below advertisement
Tarun Tejpal Case Verdict : तहलकाचे माजी संपादक तरुण तेजपाल यांना गोवा कोर्टानं दिलासा दिला आहे. तरुण तेजपाल यांच्यावर एका महिलेनं लिफ्टमध्ये लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप केला होता. गेल्या 8 वर्षांपासून तरुण तेजपाल यांच्याविरोधात हा खटला सुरु होता. अखेर गोवा कोर्टानं त्यांना दिलासा देत त्यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.
दरम्यान, एका महिलेनं तरुण तेजपाल यांच्यावर नोव्हेंबर 2013 मध्ये गोव्याच्या एका फाईव्ह स्टार हॉटेलच्या लिफ्टमध्ये लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप केला होता. त्यानंतर 30 नोव्हेंबर 2013 मध्ये त्यांना याप्रकरणी अटक करण्यात आली होती. त्यानंतर तरुण तेजपाल यांना जामिन मंजूर झाला होता. त्यानंतर याप्रकरणाची चौकशी करत असलेल्या गोवा पोलिसांनी 2014 मध्ये तरुण तेजपाल यांच्याविरोधात 2,846 पानांचं आरोपपत्र दाखल केलं होतं.
Continues below advertisement