Tamilnadu: 40 हजार ब्राम्हण तरुण लग्नाविना ABP Majha
Continues below advertisement
तामिळनाडूत काहीशी वेगळी परिस्थिती निर्माण झालीय. तामिळनाडूत जवळपास ४० हजार ब्राह्मण तरुण लग्नाविनाच आहेत. ही समस्या दिवसेंदिवस आणखी गंभीर होत चाललीय. त्यामुळेच आता या परिस्थितीवर तोडगा काढण्यासाठी या तरुणांनी शक्कल लढवलीय. वधू शोधण्यासाठी या तरुणांनी आता उत्तर प्रदेश आणि बिहार या राज्यांची वाट धरलीय. तामिळनाडूत १० मुलांमागे फक्त सहा मुली लग्नांसाठी इच्छुक आहेत. त्यामुळे ही समस्या निर्माण झाल्याचं बोललं जातंय. या समस्येला मुली हेच एकमेव कारण नसून त्यामागे अनेक समस्या असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. वराच्या घरच्यांना लग्न हे साध्या पद्धतीनं नको असतं. शिवाय महागडे लग्न आणि त्याचा खर्च उचलण्याची वधू पक्षाची बऱ्याचदा परिस्थित नसते. महागडं लग्न स्टेटससाठी केलं जातं. अनेक अटी आणि आर्थिक कुचंबणा यामुळे देखील ही समस्या उद्भवल्याचं जाणकार सांगतायत.
Continues below advertisement