Tamil Nadu : ड्रीम बाईक आली... शोरूमच्या कर्मचाऱ्यांची झोप उडाली!
Continues below advertisement
तामिळनाडूतील एक हटके बातमी आहे... सलेम इथल्या एका तरुणानं त्याची ड्रीम बाईक तब्बल २ लाख ६० हजार रुपयांना खरेदी केली. पण त्यासाठी पैसे मोजताना शोरुमच्या कर्मचाऱ्यांच्या नाकी नऊ आले. कारण या तरुणानं तब्बल दोन लाख ६० हजार रुपये एक-एक रुपयांची नाणी दिली. आणि ही चिल्लर मोजताना कर्मचाऱ्यांना तब्बल १० तास लागले.... या तरुणानं आपली ड्रीम बाईक खरेदी करण्यासाठी गेली तीन वर्षे हे पैसे जमवले होते. त्यासाठी त्यानं केलेल्या कमाईतील नोटा त्यानं मंदिरं, हॉटेल आणि चहा टपरीवर देऊन त्याबदल्यात एक रुपयांची नाणी मिळवली. त्याच्या या करामतीमुळे पै-पै जमवून एखादी गोष्ट खरेदी करणं म्हणजे काय याचा अनुभव चिल्लर मोजणाऱ्या कर्मचाऱ्यांना आला.
Continues below advertisement