FasTag जाणार, GPS Tracking च्या मदतीने होणार टोलवसुली, देशात 1 लाखांहून अधिक वाहनांची चाचणी

Continues below advertisement

Fastag Toll Collection : देशात टोलवसुलीसाठी फास्टॅगचा वापर केला जातो. मात्र आता फास्टॅगचं युगही आता जाणार असून जीपीएस ट्रॅकिंगद्वारे देशात टोलवसुली होणार आहे. सॅटेलाइट नेव्हिगेशन टोलिंग सिस्टिम ही नवी यंत्रणा लागू करण्यासाठी केंद्र सरकारनं चाचण्या सुरु केल्या आहेत. त्यात देशभरातील 1 लाखांहून अधिक वाहनांचा समावेश आहे. या संदर्भात केंद्र सरकार रशिया आणि दक्षिण कोरियाच्या काही तज्ज्ञांच्या मदतीनं एक अभ्यास अहवाल तयार करत आहे. नवीन यंत्रणा लागू करण्याआधी परिवहन धोरणातही बदलाची गरज असल्याचं बोललं जात आहे.  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram