Bengaluru Muslim Student : विद्यार्थ्याला कसाब म्हटल्याप्रकरणी शिक्षकाचं निलंबन, मणिपाल इन्स्टीट्यूटमधला प्रकार

अभियांत्रिकीच्या एका विद्यार्थ्याला कसाब म्हटल्याप्रकरणी कर्नाटकातील बंगळुरूच्या मणिपाल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधील एका शिक्षकाचं निलंबन करण्यात आलंय.. शिक्षकाने वर्गात त्याला ‘कसाब’ असे संबोधल्यानंतर विद्यार्थ्याने आक्षेप घेतला. व्हिडीओत शिक्षक विद्यार्थ्याची माफी मागताना दिसतायत.  त्यावर, तुम्ही शिक्षक आहात... इतक्या जणांसमोर तुम्ही मला दहशतवादी कसे बोलू शकता? अशी विचारणा या विद्यार्थ्याने शिक्षकाला केलीये.. दरम्यान याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर याप्रकरणी चौकशीचे आदेश देण्यात आलेत.. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola