Surat Factory Fire : सुरतच्या पॅकेजिंग फॅक्टरीमध्ये अग्नितांडव, दोघांचा होरपळून मृत्यू
सुरतच्या कडोदरामध्ये पॅकेजिंग फॅक्टरीमध्ये अग्नितांडव. आगीत दोघांचा होरपळून मृत्यू झाला असून 125 जणांना सुखरुप वाचवण्यात यश आलं आहे. अग्नीशमन दल आग विझवण्याचा प्रयत्न करत असून बचावकार्य सुरु आहे.
पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरतमधील कडोदरात वरोली येथे आज सकाळी एका पॅकेजिंग फॅक्ट्रिमध्ये आग लागल्यामुळे 2 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 125 जणांना रेस्क्यू करण्यात आलं आहे. सुरतमधील पलसाना तालुक्यातील वरेली गावात तुलसी पार्क औद्योगिक इस्टेटमध्ये भीषण आग लागली. ही कंपनी साडी पॅकिंग करण्यासाठी बॅग आणि मास्क तयार करायची. जिल्हा आणि सूरत शहरातून दहापेक्षा अधिक अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आहेत.