Supriya Sule On Mamata Banerjee : ममता बॅनर्जींचे निवडून आलेले उमेदवार इंडिया आघाडीसोबतच असणार
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppSupriya Sule On Mamata Banerjee : ममता बॅनर्जींचे निवडून आलेले उमेदवार इंडिया आघाडीसोबतच असणार ... सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
Mamata Banerjee, India Alliance: नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Elections 2024) भाजपला (BJP) सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी विरोधकांनी एकजूट करत इंडिया आघाडीची (India Alliance) स्थापना केली होती. पण आता याच इंडिया आघाडीत बिघाडी झाल्याचं पाहायला मिळत आहे. पश्चिम बंगालच्या (West Bengal) मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी 'एकला चलो रे'ची भूमिका घेत इंडिया आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस स्वबळावर लढणार असल्याची घोषणा ममता बॅनर्जींनी केली आहे. त्यामुळे देशाच्या राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे.